देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीमुळे विधीमंडळात आज पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता ?

 

मुंबई | महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशनाचा आजचा दिवसही वादळी ठरण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी, नवाब मलिक यांचा राजीनामा शेतकऱ्यांच्या विजतोदिनीचा मुद्धा आदी मुद्यांवर विरोधकांनी ठाकरे सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. तर, दुसरीकडे सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनही विधीमंडळात विरोधकांच्या आरोपांना कसं उत्तर देतं याकडेही लक्ष लागले आहे.

मागील आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सरकारी वकिलांवर आणि महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते. आपल्या आरोपांच्या पुष्टीसाठी त्यांनी १२५ तासांची व्हिडिओ रेकोर्डिंगचा पेनड्राइव्ह विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला होता. फडणवीस यांच्या आरोपानंतर महाविकास आघाडी सरकार काहीसं बॅकफूट गेलं असल्याचे चित्र होते.

त्यातच रविवारी मुंबई पोलिसांनी पोलीस बदली कथित घोटाळ्याप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांची मुंबई पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानी दोन तास चौकशी केली. फडणवीस यांची चौकशी राजकीय सूडबुद्धीने करण्यात आली असल्याचा आरोप भाजपने केला होता. तर, फडणवीस यांना याआधी ६ वेळेस नोटीस देण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्याला उत्तर दिले नसल्याने पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन जबाब नोंदवला असल्याची माहिती सरकारने दिली.

Team Global News Marathi: