राज ठाकरे यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर मनसेच्या मुस्लीम कार्यकर्त्यांचे राजीनामे

 

पुणे | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ एप्रिल रोजी गुडीपाडव्याच्या दिवसाशी आयोजित मेळाव्याला मशिदीवरील भोंग्याबाबत वक्तव्य केले या वक्त्यव्यानंतर आता पुण्यातील मनसे पदाधिका-यांनी राजीनामे दिले आहेत. मनसेच्या शाखा अध्यक्षांसह इतर मुस्लिम पदाधिका-यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली आहे. तसच या भोंग्यांना उत्तर म्हणून हनुमान चालिसा लावू असंही त्यांनी म्हंटलं आहे. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून पुण्यातील मनसेच्या मुस्लीम पदाधिका-यांमध्ये नाराजी आहे.

शाखा अध्यक्ष माजीद शेख यांच्यासह मुस्लीम पदाधिकारी यांनी वसंत मोरे यांच्याकडे राजीनामे दिले आहेत. येत्या काही दिवसात मनसेचे अनेक मुस्लीम पदाधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत. राज ठाकरे यांनी मुस्लीम समाजाविरोधातील केलेल्या भाषणामुळे मुस्लीम समाज नाराज झाला आहे . पूर्वी पक्षाची भूमिका वेगळी होती पक्षाची भूमिका बदलल्यामुळे आम्ही तर राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक भागातील कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावला. मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी आक्रमक हिंदुत्वादाची भूमिका घेतली होती. मशिदींवरील भोंगे बंद झाले नाहीत, तर त्यासमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावणार असल्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला होता. यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. राज ठाकरेंच्या आदेशानंतर मुस्लीम कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

Team Global News Marathi: