आता मुंबईत प्रत्येकजण आता लोकल ट्रेनमध्ये प्रवास करू शकतो

 

मुंबई | राज्य सरकारने सर्व कोविद नियम हटवले असून याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. लसीकरणाशी संबंधित पर्याय आपल्या तिकीट अॅपमधून हटविला आहे. आतापर्यंत, केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांनाच लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी होती. मात्र आता निर्बंध हटविल्यामुळे प्रवाश्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. तर काही लोकांमध्ये याबाबत नाराजी दिसून येत आहे.

निर्बंध उठवण्याच्या राज्य सरकारच्या निर्देशांनुसार, रेल्वेने सर्व निर्बंध उठवले आहेत आणि मुंबईतील रेल्वेसाठी काउंटरवर आणि अॅपवर सर्वांसाठी तिकीट सुविधा सुरू केली आहे. याचा अर्थ प्रवाशांना आता त्यांची लस प्रमाणपत्रे तिकीट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नाही. यासंबंधित सर्व सूचना आता मागे घेण्यात आल्या आहेत,’ असे रेल्वेच्या प्रवक्त्याने सांगितले.

एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले की, सर्व अधिकृत प्रवेश-एक्झिट गेट्स, लिफ्ट्स, एस्केलेटर, कोरोना महामारीच्या काळात बंद केलेले फूट ओव्हरब्रिज, सर्व व्यावसायिक तिकीट काउंटर आणि बुकिंगसाठी एटीव्हीएम मशीन आता उघडल्या जातील. महाराष्ट्रातील कोविड प्रकरणांमध्ये घट झाल्याचे सांगत राज्य सरकारने नुकतेच १ एप्रिलपासून सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला. ताज्या आकडेवारीनुसार, मुंबई उपनगरीय गाड्यांवरील दैनंदिन प्रवासी संख्या जवळपास ६५ लाखांवर पोहोचली आहे.

Team Global News Marathi: