राज ठाकरें यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आशा भोसले पोहचल्या शिवतीर्थावर

 

राज्यातील राजकीय घडामोडींसंदर्भात राज यांनी अद्याप आपली भूमिका किंवा प्रतिक्रियाही दिली नाही. मात्र, नवीन सरकारचं अभिनंदन करताना देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी मोठं कौतुक केलं होतं. त्यानंतर, उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर देवेंद्र फडणवीस यांनीही राज ठाकरेंची शिवतिर्थ बंगल्यावर जाऊन त्यांची भेट घेतली. तर, आज ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी राज यांची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली.

राज्यात घडणाऱ्या राजकीय घडामोडीत आता मनसेही सक्रीय झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसे प्रमुख राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर आले आहे. अलीकडेच राज यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर विश्रांती घेऊन मनसे महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही राज ठाकरेंनी गेल्या आठवड्यात घेतली होती.

तसेच काही दिवसांपूर्वी बंडखोर आमदार सदा सरवणकर हेही राज यांची भेट घेऊन गेले होते. आता, आशा भोसले यांनीही राज ठाकरेंची भेट घेतली. यावेळी, राज यांच्या घरातील आशा भोसलेंचा एका फोटो व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राज यांच्या हातात काठी दिसत असून त्यांनी आशाताईंच्या खांद्यावर हात ठेवला आहे.

 

कोंबडी रस्सावर अमित ठाकरेंसोबत कार्यकर्त्यांना मारला ताव

 

आदित्य ठाकरेंनी थेट एकनाथ शिंदेंच्या घरासमोर गाडी थांबवली, अन्.

Team Global News Marathi: