भाजपचीच सत्ता जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येणार -आमदार राजेंद्र राऊत

भाजपचीच सत्ता जिल्हा परिषदेत भाजपचीच सत्ता येणार -आमदार राजेंद्र राऊत

सोलापूर : राज्यामध्ये सेना-भाजप युतीचे सरकार आल्यापासून सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? होणार याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. यासाठी अनेक नेत्यांची नावे समोर येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने राजेंद्र राऊत यांच्या नावाची मागील काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरू आहे. आमदार राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे मानले जातात त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागेल असे बोलले जाते.

दरम्यान गुरुवारी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता काही पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी मंत्रीपदा बाबत विचारले असता बार्शीतील पत्रकारांशी चर्चा करताना मंत्रीपदाबाबत आता चर्चा नको असे सांगत मंत्री पदापेक्षा मला बार्शीचा विकास करणे आवडेल. बार्शी तालुक्यातील सिंचन योजनेला निधी मिळवण्यासाठी मी सध्या प्रयत्न करत आहे नुकताच बार्शी नगरपालिकेसाठी 89 कोटीचा निधी मंजूर झाला आहे अशी माहिती त्यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक या ओबीसी आरक्षणासह होणार असल्याने याचा निश्चितच भाजपला फायदा होणार आहे. येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत झेडपीवर भाजपची सत्ता येणार असा दावा ही त्यांनी यावेळी केला. बार्शीतील विरोधक सोडले तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वच पक्षातील नेत्यांसोबत आपले चांगले संबंध आहेत असे सांगून जिल्हा परिषदेत झालेल्या समविचारी आघाडीवर जादा बोलणे टाळले.

साभार सिंहासन

ग्लोबल न्युज नेटवर्क: