‘
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. राज यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडूनसुद्धा उत्तर दिले जात आहे. राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी राज ठाकरेंना उत्तर देतांना, “लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पवार साहेब सक्षम आहेत, सरड्याला लाजवेल अशा दर सहा महिन्यांनी भूमिका बदलणाऱ्यांनी एवढंच लक्षात ठेवावं’, अशी टीका केली आहे. चव्हाण यांनी फेसबुकवर पोस्ट करत ही टीका केली आहे.
सतीश चव्हाण यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, “देवाच्या आशीर्वादाने सूर्योदयापासून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पवार साहेब सक्षम आहेत. सरड्याला लाजवेल अशा दर सहा महिन्यांनी भूमिका बदलणाऱ्यांनी एवढंच लक्षात ठेवावं, असं चव्हाण यांनी म्हटलं आहे. तर याचवेळी त्यांनी आपल्या पोस्टमध्ये एक हिंदी शेरसुद्धा लिहला असून ज्यात, “कितना भी शोर करले..तू तो बस एक तोता है…मजबूरी से ही सही..तेरा ‘किसिसे’ समझोता हैं” असे म्हटलं आहे.
काय आहे प्रकरण