राज ठाकरेंना शिराळा न्यायालयाकडून पुन्हा अजामीनपात्र वॉरंट

मनसे अध्यक्ष राज डाकरे वारंट हुकूम होऊन देखील हजर न राहिल्यामुळं न्यायालयाने बुधवारी पुन्हा अजामीन पत्र वारंट आदेश जारी केला आहे. पुढील तारीख 11 जुलै 2022 दिली आहे. मनसे नेते शिरीष पारकर यांनी न्यायालयात हजर राहून जामीन अर्ज दिल्याने त्यांचा अजामीनपात्र वारंट आदेश रद्द केला गेला आहे. मात्र राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊन देखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. म्हणून न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश दिला आहे.

शिराळा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात नियमित फौजदारी खटला सुनावणी झाली. यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आरोपी क्रमांक 9 शिरीष पारकर हे आरोपी क्रमांक दहा म्हणून समाविष्ट आहेत. यापूर्वी या दोघांनाही न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंटचा आदेश केला होता. त्याप्रमाणे शिरीष पारकर यांनी बुधवारी न्यायालयात हजर राहून जामीन दिला. यावेळी न्यायालयाने त्यांच्या विरुद्ध केलेला अजामीनपात्र वॉरंटचा आदेश रद्द केला.न्यायालयाने पारकर यांना 15 हजार रुपयांच्या जामिनावर आणि 700 रुपए खर्चाची दंडाची रक्कम भरून जामीन मंजूर केला.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वारंट हुकूम होऊनदेखील न्यायालयात हजर राहिले नाहीत. यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पुन्हा अजामीनपात्र वॉरंटचा आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. ए. श्रीराम यांनी दिला आहे. दरम्यान ठाकरे यांच्या वकिलांनी इंस्लामपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात रीट दाखल केले आहे.

Team Global News Marathi: