भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना समन्स

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना समन्स

भीमा कोरेगाव प्र करणी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आयोगाने समन्स जारी केलं आहे. आतापर्यंत या आयोगाकडून राज्यातील महत्त्वाच्या पाच पक्षप्रमुखांना समन्स जारी करण्यात आलं आहे. या आधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने साक्ष नोंदवली आहे.

भीमा कोरेगाव प्रकरणी सुरू असलेल्या कारवाई संदर्भात मत मांडण्यासाठी हे समन्स जारी करण्यात आलं आहे. आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या पक्षप्रमुखांना आयोगाने समन्स पाठवलं असून या या पाचही पक्षप्रमुखांना 30 जून पर्यंत आपलं म्हणणं अॅफेडेव्हिटच्या माध्यमातून मांडावे लागणार आहे. त्यानंतर जबाब नोंदवण्यासाठी बोलवायचं किंवा नाही यावर आयोग निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

पुण्यातील कोरेगाव-भीमा येथे 1 जानेवारी 2018 रोजी घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर राज्यभरात दंगल उसळली होती. पुणे जिल्ह्यात घडलेल्या भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास एनआयकडे सोपवला असला तरी राज्य सरकरातर्फे चौकशी आयोगाचं कामकाज निवृत्त न्यायमूर्ती जे.एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे सुरू आहे.

Team Global News Marathi: