राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे सदस्य नोंदणीला सुरवात

आगामी मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच मुंबई मनपात सत्तेत बसलेल्या शिवसेनेला जोरदार टक्कर देण्यासाठी मनसेने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केलेली दिसून येत आहे.

त्यातच येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज पासून मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरवात होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सुरवात होणार आहे. आज सकाळी १० वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी स्वतःची सदस्य नोंदणी करणार आहेत.

तसेच मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर सदस्य नोंदणीसाठी वृत्तपत्रात आलेल्या जाहिरातीचा मजकूर काल रात्री व्हॉटस् अप करण्यात आला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त सदस्य नोंदणीचे मनसेचे लक्ष्य आहे.
मनसेच्या जाहिरातीमुळे शिवसेना स्थापनेच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापनेवेळी व्यंगचित्र साप्ताहिक ‘मार्मिक’मध्ये जाहिरात देऊन मराठी भाषिकांना शिवसेनेचे सदस्य होण्यासाठी साद घातली होती.

Team Global News Marathi: