अखेर सचिन वझे यांना अटक, NIA कडून मोठी कारवाई

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली स्कॉर्पिओ ठेवल्या प्रकरणात तब्बल १३ तासांच्यावर सचिन वाझे यांची NIA कडून चौकशी करण्यात आली होती. अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर वाझे यांना NIA कडून अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी शनिवार सकाळी ११ वाजल्यापासून ते रात्री ११.३० वाजेपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती, अखेर १३ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. वाझे प्रकरण सभागृहात सुद्धा चांगलेच गाजले होते.

मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्कॉर्पिओमध्ये स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याने गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर एटीएस आणि एनआयए लक्ष ठेऊन होते. अखेर NIA च्या चौकशीनंतर सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.

स्फोटके बाळगणे त्याचबरोबर अंबानी यांच्या बंगल्याशेजारी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडीला पार्क करण्याच्या गुन्ह्यात महत्त्वाची भूमिका असण्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हेसुद्धा दाखल करण्यात आले आहेत.

Team Global News Marathi: