राज ठाकरे प्रसिद्धीसाठी काहीही वक्तव्य करत आहेत – जयंत पाटील

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी विजबिला संदर्भात आदनी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या झालेल्या भेटीवर भाष्य करत टीका केली होती. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात एकच चर्चा रंगली होती. आता यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाष्य करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

राज ठाकरे यांना सध्या प्रसिद्धीची गरज असल्याने ते अशाप्रकारे बेफाम वक्तव्य करीत असल्याचा घणाघात जयंत पाटील यांनी केला आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदा विभागांतर्गत अकोला जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या कामाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले होते राज ठाकरे

राज ठाकरे म्हणाले, “सरकार इतकं निर्दयीपणे कसं वागू शकतं कळत नाहीये. मुलांच्या परीक्षांचा विचार नाही करायचा, कशाचाच विचार नाही करायचा. वीज बिल माफ होण्यासाठी वीज कंपन्यांबरोबर चर्चा कराव्या लागतील. पण या चर्चा थांबल्या आहेत. काही तरी लेणदेण झाल्याशिवाय या चर्चा थांबणार नाहीत. सरकार सर्व वीज कंपन्यांना पाठिशी घालण्याचं काम करत आहे.” असा आरोप त्यांनी लगावला होता.

Team Global News Marathi: