येत्या काही दिवसात पाऊसाचा जोर वाढणार – डॉ रामचंद्र साबळे

येत्या काही दिवसात पाऊसाचा जोर वाढणार – डॉ रामचंद्र साबळे; हवामान तज्ञ

मुंबई : जून महिन्यात 50 टक्क्यांहून अधिक खंड दिलेल्या पावसाने काल पासून राज्यभरात जोर धरला आहे.येत्या काही दिवसात देखील पाऊसाचा जोर वाढणार असून शुक्रवारी आणि शनिवारी कोकणात अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

मुंबईसह ठाणे आणि संपूर्ण कोकण विभागात सोमवारपासून सर्वत्र सुरु असणाऱ्या मुसळधार पाऊसाचा जोर येत्या काही दिवसांमध्ये अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सोमवार दुपारपासूनच या भागामध्ये पवासाचा जोर सुरु असून मंगळवारी सकाळीही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय.जो पाऊस जून महिन्यात थांबला होता तो आत्ता बरसायला सुरवात झाली आहे.

मान्सूनचा पुनरागमन झाला आहे.अस आत्ता म्हणता येईल अस देखील यावेळी साबळे यांनी सांगितले. राज्यात पाऊसाचा पुनरागमन होत असून येत्या काळात शेतीच्या कामांना जोर येणार आहे.जो पाण्याचा प्रश्न काही दिवसांमध्ये तयार झाला होता तो पाण्याचा प्रश्न दूर होणार आहे.आणि सप्टेंबर पर्यंत ज्या धरणांमध्ये आजच्या परिस्थितीत पाणी कमी आहे ती सर्व धरणे भरतील असं देखील यावेळी साबळे यांनी सांगितले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: