महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पडणार पाऊस ; वाचा सविस्तर-

महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पडणार पाऊस ; वाचा सविस्तर-

Five Days Rain Alert For Maharashtra । मुंबईः महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत पाऊस पडणार आहे. वेधशाळेने हा अंदाज व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होत असल्यामुळे ऐन थंडीत महाराष्ट्रातील १३ जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला आहे.

राज्यात रविवार १४ नोव्हेंबर २०२१ ते गुरुवार १८ नोव्हेंबर २०२१ दरम्यान पाऊस पडेल. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्हात वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल असा अंदाज आहे. बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद परिसरात पुढील दोन दिवस पाऊस पडेल असा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्टही देण्यात आला आहे.

सातारा शहर आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागांमध्ये तसेच रत्नागिरी जिल्ह्याच्या काही भागांमध्ये आज (रविवार १४ नोव्हेंबर २०२१) पावसाने हजेरी लावल्याची माहिती वेधशाळेने दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: