‘राहुल’जी पंतप्रधान नाही पण; विको वज्रदंतीचे अ‍ॅम्बेसिडर नक्की होतील’

 

काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रे दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधींनी ऊस खाल्ला. त्यांचा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी हा फोटो ट्विट करत खोचक टोला लगावला आहे. “राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत; पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर नक्की होतील.” असे म्हणत त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ या यात्रेला जनतेकडून जोरदार प्रतिसाद मिळत असून या यात्रेची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे. या यात्रेत पक्षाचे अनेक नेते जोडले जात आहेत. आता पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधीही या यात्रेत सहभागी होणार आहेत. यात्रेत सहभागी होण्यासाठी सोनिया गांधी म्हैसूरला पोहचल्या आहेत. त्या ६ ऑक्टोबर रोजी कर्नाटकातील मंड्या येथे यात्रेत सहभागी होतील. प्रदीर्घ काळानंतर सोनिया गांधी पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

दरम्यान, भाजपने राहुल गांधींवर मिश्किल टिपण्णी करत त्यांना डिवचले आहे. अतुल भातखळकर यांनी ट्विटर अकाऊंटद्वारे “राहुल गांधी पंतप्रधान झाले नाहीत, होणारही नाहीत, पण विको वज्रदांतीचे ब्रँड ॲम्बेसडर मात्र नक्की होतील.” असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ७ सप्टेंबर रोजी कन्याकुमारी येथून ‘भारत जोडो’ यात्रेचा शुभारंभ केला. भारत जोडो यात्रेदरम्यान १५० दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासात ३,५०० किमीचे अंतर कापले जाणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेचा समारोप होणार आहे.

Team Global News Marathi: