कार्यकर्त्यांना दारू-मटण नाही तर किमान ‌चटणी-भाकर मिळायला हवी

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झालेले शिर्डीचे खासदार हे हजारो कार्यकर्त्यांना घेऊन शिर्डीहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. सात ते आठ हजार कार्यकर्ते घेऊन शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे घेऊन जात असल्याचा दावा केला आहे. त्यातच माध्यमांशी बोलतांना खासदार सदाशिव लोखंडे यांनी खळबळ उडवून देणारं विधान केले आहे.

कार्यकर्त्यांना दारू-मटण नाही किमान चटणी-भाकर, भाजी-भाकर तरी मिळायला ही ही तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखवली असल्याचे खासदार लोखंडे यांनी म्हंटले आहे. त्यामुळे कार्यकर्त्याच्या जेवणावळीवर लोखंडे यांनी केलेल विधान चर्चेचा विषय ठरत आहे.

शिर्डी लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार सदाशिव लोखंडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे असून हजारो कार्यकर्ते घेऊन ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. उत्तर नगर जिल्ह्यातून जवळपास सात ते आठ हजार कार्यकर्ते मुंबईतील बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याचा दावा लोखंडे यांनी केला आहे.

यावेळी कार्यकर्त्यांनीची देखभाल करणे हे नेत्यांचे काम असून कार्यकर्ते हे पहाटेपासूनच उठले आहेत. त्यामुळे भुकेलेल्या अन्न द्यावे लागेल ना ? असा सवाल लोखंडे यांनी उपस्थित केला आता त्यांच्या या विधानावर कोणत्या प्रतिक्रिया उमटतात हे पाहावे लागेल.

Team Global News Marathi: