राहुल शेवाळे यांच्या त्या आरोपावर संजय राऊत संतापले

 

मुंबईच्या निवडणुकीत बिहारी लोकांची मते मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचा विचार करून असे खोटे आरोप होताहेत, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला.भाजपचे नेते निवडणुकांमध्ये यश मिळविण्यासाठी असे प्रयत्न सुरुवातीपासून करताहेत. यापूर्वी बिहारची निवडणूक असताना सुशातसिंह राजपूत यांच्या आत्महत्येचे राजकारण करण्यात आले. गुजरात निवडणुका आल्या तेव्हा महाराष्ट्रातील प्रकल्प पळविण्यात आले. कर्नाटक निवडणुका येताच सीमावाद तापविण्यात येत आहे. तसाच प्रकार ‘एयू’बाबत आहे.

मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला की बोलू दिल्या जात नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे मुद्दे सभागृहात येत नाहीये, असे रोहित पवार म्हणाले. मोघम बोलून विषय टाळण्यात येत आहे, असेही ते म्हणाले.तुमच्या घरातल्या सुद्धा फायली निघू शकतात. फाईलींची लढाई सुरू झाली तर जड जाईल, असा इशाराच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिला.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणी शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. याच मुद्दावर संजय राऊत यांनी शेवाळे यांच्यावर सडकून टीका केली.’शेवाळे हा किरकोळ माणूस आहे, जो सदस्य सदनात नसतो त्याचं नाव घेता येत नाही. असा लोकसभेचा नियम आहे. हे ठरवून चाललं आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात आरोप होत आहे, म्हणून अशी विधान करत आहे. अशा कितीही फाइल निघतील. तुमच्या घरातल्या सुद्धा फायली निघू शकतात. फाईलींची लढाई सुरू झाली तर जड जाईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.कोण बिहार पोलीस आहे, महाराष्ट्र पोलिसांवर तुमचा विश्वास नाही का?

सीबीआयवर तुम्हाला विश्वास नाही का? सीबीआयने क्लिन चिट दिल्यानंतर तुम्हाला विश्वास नाही का? असा संतप्त सवाल राऊत यांनी केला. ‘सुशांत सिंह राजपूत प्रकरण त्यावेळी विरोधक पक्षाने अशा पद्धतीने उभं केलं आणि ते त्यांच्यावरच उलटलं.

सुशांत सिंह राजपुत यांची आत्महत्या होती हे सीबीआयने सांगितली आहे. ज्याच्यावर बलात्कार आणि विनयभंगाचे आरोप आहेत. कालपर्यंत जो शिवसेनेच्या ताटात जेवत होता, त्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप करणे म्हणजे जे फुटीर लोग किती खालच्या स्तरावर गेले आहे हे दिसून येत आले, अशी टीका राऊत यांनी केली.

Team Global News Marathi: