सुशांतसिंह प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी दिले संकेत

 

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपुरात तसे संकेत दिलेत. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत जनतेच्या मनात संभ्रम होता आणि अजूनही आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय. दरम्यान, शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत या प्रकरणी गंभीर आरोप केल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत.

दक्षिण मध्य मुंबईचे खासदार तथा शिंदे गटात सामील झालेले राहुल शेवाळे यांनी अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणात युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले नसले तरी त्यांच्याविषयी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुशांतसिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईलवर एयू या नावानं आलेले कॉल्स हे आदित्य उद्धव ठाकरे यांचे होते की, अनन्या उधास यांचे होते, असा प्रश्न खासदार शेवाळे यांनी लोकसभेतल्या भाषणादरम्यान उपस्थित केला. बिहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ए यू म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून आदित्य-उद्धव असल्याचं खळबळजनक वक्तव्य राहुल शेवाळे यांनी सभागृहात केलंय. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्र्यांनी सुशांतसिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याचे संकेत दिले आहे.

सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावरून आधीपासूनच आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. नितेश राणे यांनी देखील विधानसभेच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करण्याची मागणी केली आहे. नितेश राणे म्हणाले, आदित्य ठाकरेची नार्को टेस्ट करा, सत्य बाहेर येऊ द्या. आजही दिशा सालियानची केस मुंबई पोलिसांकडे आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सुशांत सिंह प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Team Global News Marathi: