राहुल गांधींच्या नाईटक्लब पार्टीला प्रत्युत्तर देत काँग्रेसनं आणली शॅम्पेन

 

भाजपने काठमांडू येथील एका नाईट क्लबमधील राहुल गांधी यांचा व्हिडीओ जारी केल्यानंतर, काही तासांतच काँग्रेसने भाजपला जशास तसे उत्तर दिले आहे. काँग्रेसने राज्यसभा खासदार आणि भाजपचे जेष्ठ नेते प्रकाश जावडेकर यांचा एका पार्टीत शॅम्पेनची बाटली पॉप करतानाचा फोटो सोशल मिडियावर टाकला आहे. हा फोटो काँग्रेस नेते बीव्ही श्रीनिवास यांनी ‘पहचान कौन?’ असे कॅप्श देत शेअर केला आहे.

भाजप समर्थकांनी राहुल गांधी यांचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. एवढेच नाही, तर तेथे त्यांच्या सोबत उभी असलेली महिला ही चीनची राजदूत असल्याचेही म्हणण्यात आले आहे. यानंतर, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांनी ट्विटर अकाउंटवर प्रकाश जावडेकर यांचा फोटो ट्विट केला आहे. या फोटोत जावडेकर हातात शॅम्पेनची बॉटल ओपन करताना दिसत आहेत. यात ते पार्टी एन्जॉय करताना दिसत आहेत.

सुरजेवाला म्हणाले, ‘राहुल गांधी हे एका मित्राच्या लग्नासाठी काठमांडू येथे गेले होते. ते खासगी दौऱ्यावर होते. पण, भाजपचे लोक ऊर्जा संकट आणि महागाई सारख्या मुद्द्यांवर उत्तर का देत नाहीत. त्यांच्याकडे केवळ राहुल गांधींवर बोलण्यासाठीच संपूर्ण वेळ आहे.

Team Global News Marathi: