नवी दिल्ली | पेगासस सॉफ्टवेअरवरून विरोधक मोदी सरकारवर आरोप करत आहेत. त्यातच पुन्हा एकदा पेगाससमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. अमेरिकेच्या न्युयॉर्क टाई्म्सने पेगासस खरेदीची बातमी छापल्याने भारतीय राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
मोदी सरकारने आपल्या लोकशाहीतील प्राथमिक संस्था, राजकीय नेते आणि जनतेची हेरगिरी करण्यासाठी पेगासस सॉफ्टेवेअर खरेदी केले आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. विरोधक, न्यायपालिका आणि लष्कराचे फोन टॅप करून या सर्वांना टार्गेट केलं आहे. हा देशद्रोह आहे. मोदी सरकारने देशद्रोह केला आहे, असा गंभीर आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.
अमेरिकेतील न्युयॉर्क टाईम्सने रिपोर्ट प्रकाशिक केला आहे. त्यामध्ये पेगाससवर सॉफ्टवेअर संदर्भात काही माहिती दिली आहे. केंद्र सरकारकडून 5 वर्षांपूर्वी मिसाईल सिस्टीम डिफेन्स डिलसाठी २० बिलियन डॉलर म्हणजे १५ हजार कोटी रूपये पॅकेजच्या नावाने इस्त्राईली सॉफ्टवेअर पेगाससची खरेदी केली, असं द न्युयॉर्क टाईम्सने प्रकाशित केलेल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.