नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरातून नाही तर विदेशातून सुद्धा शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांच्या वाढदिवसानिमित्त जम्बो लसीकरणाच्या कार्यक्रमाची आखणी केली आहे. त्यातच आता मोदी यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सुद्धा नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी ट्विटर करून त्यात असे लिहिले, “वाढदिवसाच्या शुभेच्छा, मोदी जी.” असे ट्विट केले आहे
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप आज दिल्ली मुख्यालयात ‘सेवा आणि समर्पण अभियान’ कार्यक्रम सुरू करणार आहे. हा कार्यक्रम ७ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार असून ७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींच्या राजकीय प्रवासाला २० वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच, भाजप युवा संघटना या दिवशी रक्तदान शिबीर आयोजित करणार आहेत.
या मोहिमेत भाजप कार्यकर्ते घरोघरी, विविध कार्यक्रमांद्वारे जनतेशी संपर्क साधतील आणि संवाद साधतील, सेवाकार्य करणार असल्याचे सांगितले जात आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपने २० दिवसांच्या देशव्यापी मोहिमेची योजना आखली आहे जी आजपासून सुरू होईल आणि ७ ऑक्टोबर रोजी संपेल. मात्र काँग्रेस पक्ष पंतप्रधान मोदींचा वाढदिवस ‘राष्ट्रीय बेरोजगारी दिवस’ म्हणून साजरा करत आहे.
भाजपच्या या २० दिवसांच्या अभियानामागील कारण म्हणजे आजपासून २० दिवस म्हणजेच ७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. त्यामुळे भाजपने ७ ऑक्टोबरपर्यंत हे अभियान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर भाजपने यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन केली जी कार्यकर्त्यांसाठी कार्यक्रम आयोजित करणार आहे
Happy birthday, Modi ji.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 17, 2021