पुणे | पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका पठ्याने आपल्या प्रेयसीला फिरवण्यासाठी एक दोन नव्हे तर तब्बल 15 वाहने चोरले आहेत. प्रेमासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात हे या पठ्याने सिद्ध केले आहे. यश सोळसे असे या आरोपी प्रियकराचे नाव आहे. त्याला वाहन चोरी केल्याप्रकरणी निगडी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
मागच्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरीच्या घटनात वाढ होत आहेत. यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमे अंतर्गत विविध वाहणाची तपासणी करत असताना त्यांना हा आरोपी कार चालविताना आढळून आला. ती चालवत असलेली कार ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने ही कार चोरल्याचे सांगितले. यानंतर त्याने केलेल्या सगळ्या चोऱ्या पोलिसांनी उघड केल्या.
या आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने धक्कादायक माहिती सांगितली. त्याने आतापर्यंत 15 वाहन चोरी केली. यात. 2 चारचाकी तर 13 मोटरसायकलींचा समावेश आहे. त्याच्याकडून ही सर्व वाहने आणि 3 लाख 45 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही वाहने कशासाठी चोरली हे विचारले असता त्याने ही सर्व वाहने आपल्या प्रेयसीला फिरवण्यासाठी चोरली असल्याचे सांगितले.