पुष्पा द राइज चित्रपटाच्या नंतर अल्लुअर्जुनचा भाव पोचला गगनाला

मुंबई | सध्या देशभरात सगळीकडे अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा: द राइज’या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु झाली असून दाक्षिणात्यच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही या चित्रपटानं तुफान यश मिळवलं असून, अल्लू अर्जुनच्या प्रसिद्धीचा डंका सर्व देशभरात गाजताना दिसत आहे.

सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटाने ३०० कोटी रुपयांहून अधिक व्यवसाय केल्यानं अल्लू अर्जुनचा समावेश सुपरस्टार रजनीकांत, प्रभास आणि थलपथी विजय यांच्या १०० कोटींच्या क्लबमध्ये झाला आहे. त्याचे चाहते त्याच्या नवीन चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.

‘पिंकव्हिला’च्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शक अॅटलीच्या आगामी चित्रपटात अल्लू अर्जुन दिसणार आहे. दिलेल्या वृत्तानुसार, लायका प्रॉडक्शननं अल्लू अर्जुनला या नव्या चित्रपटासाठी तब्बल १०० कोटी रुपये देऊ केले असल्याची चर्चा आहे. ‘पुष्पा’साठी त्याला ७५ कोटी रुपये मिळाले होते. अल्लू अर्जुन आणि अॅटली यांची नव्या चित्रपटासाठी एक बैठकही झाली असल्याचं समजतं आहे.

Team Global News Marathi: