‘पुष्पा 2’साठी अल्लू अर्जुनने दुप्पट घेतलं मानधन; आकडा वाचून व्हाल थक्क !

 

अभिनेता अल्लू अर्जुन सध्या ‘पुष्पा 2’ या सिनेमाच्या पोस्टरमुळे चांगलाच चर्चेत आहे.दोन दिवसापूर्वी या सिनेमाचा टीझर लाँच झाला आहे. तसेच या सिनेमातील ‘पुष्पा’चा लूकदेखील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता टीझर रिलीज झाल्याने पुष्पाच्या पुढच्या भागाची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. तसेच आता ‘पुष्पा’ सिनेमातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार,’पुष्पा द राइज’ या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 45 कोटी रुपये आकारले होते. आता या सिनेमाचा पुढचा भाग अर्थात ‘पुष्पा द रुल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमासाठी अल्लू अर्जुनने 85 कोटी मानधन घेतली आहे. पुष्पा’ सिनेमाप्रमाणे ‘पुष्पा 2’मध्येही अल्लू अर्जुनसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत झळकणार आहे. तसेच मीडिया रिपोर्टनुसार, ‘पुष्पा द रुल’ या सिनेमात साई पल्लवीची एन्ट्री होऊ शकते असे म्हटले जात आहे.

‘पुष्पा द राइज’ हा सिनेमा आंध्र व तेलंगनामधील बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात कमी पडला होता. पण जागतिक पातळीवर हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे. अल्पावधीतच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. अल्लू अर्जुसह ‘पुष्पा’चा दिग्दर्शक सुकुमारनेदेखील ‘पुष्पा द रुल’ या सिनेमासाठी मानधन वाढवलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी ‘पुष्पा द रुल’ या सिनेमातील अल्लू अर्जुनचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. भरजरी साडी, हातात बांगड्या, बंदूक, गळ्यात लिंबाची माळ, कानात झुमके, गळ्यात हार या पुष्पाच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं असून ते आता सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत

Team Global News Marathi: