शुद्धीकरण करण्याशिवाय ते काहीच करू शकत नाही; नारायण राणेंचं प्रत्युत्तर

 

केद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआर्शीवाद यात्रेला कालपासून मुंबईतून सुरूवात केली. यात्रा सुरु करण्यापुर्वी नारायण राणेंनी शिवसेना प्रमुख वंदनीय स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला वंदन केलं होतं. मात्र नारायण राणे निघून गेल्यावर शिवसैनिकांनी स्मृतीस्थळाचं गोमूत्र आणि दुग्धभिषेक घालून शुद्धीकरण केलं आहे. यावरून आता राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. “उद्धव ठाकरेंच्या कारकिर्दिचं सगळ्यात उत्तम काम आहे. हे शुद्धीकरण करणं. दुसरं ते काहीही करु शकत नाही” अशा शब्दांत केंद्रीय नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंनाच शुद्धीकरणाची गरज आहे.

आधी मनाचं शुद्धीकरण करा, जनतेची कामं कर चांगलं, वर्षा बंगल्यावर मी राहून गेलो तिकडंही गोमूत्र शिंपड, मंत्रालयात मी ज्या जागी बसलो तिकडेही तुम्ही बसलाय तिकडंही गोमूत्र शिंपडा असं अरे-तुरे करत नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच आमदार नितेश राणे यांनी सुद्धा ट्विट करून प्रतिक्रिया दिली होती

त्यात ते म्हणाले की, ”अडवण्याची भाषा करणारे गोमुत्रावर आले आहेत. म्हणून पुढच्यावेळी चड्डीत राहायचं.” आता नितेश राणेंच्या या ट्विटला शिवसेना काय उत्तर देते हे पाहावे लागेल.

Team Global News Marathi: