पुण्यात शिंदे गट करणार धमाका; मनसे, राष्ट्रवादीचे अनेक नेते करणार पक्ष-प्रवेश?

 

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. आता पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदे गटाने आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुण्यातील अनेक मोठे नेते हे बाळासाहेबांची शिवसेना गटाच्या गळाला लागले आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात राजकीय आखाडा चांगलाच तापला आहे.


अशातच आता निवडणूक जाहीर होण्याआधीच आयाराम-गयाराम गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी तयार आहे. मुंबई, ठाणे पाठोपाठ शिंदे गटाने आता पुण्यात सुद्धा जोरदार तयारी सुरू केली आहे. पुण्यात एकनाथ शिंदेंचा गट मोठ्या पक्षांना धक्का देण्याचा तयारीत आहे. पुण्यातील अनेक मोठे नेते हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थित पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आला आहे.

पुण्यातील अनेक बडे नेते बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील अनेक नेते हे आपल्या संपर्कात आहे. लवकरच ते शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे, असा दावा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांनी केला आहे.

Team Global News Marathi: