पुण्यात रिक्षाचालकांच्या संपाचा दुसरा दिवस; संपकऱ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

 

पुण्यामध्ये बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षाचालकांनी बेमुदत संप पुकारला आहे. त्याचा आज दुसरा दिवस असून पुण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी पुण्यात चालणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्याची मागणी केली आहे. राज ठाकरेंनी रिक्षाचालकांच्या समस्या जाणून घेत त्या मुख्यमंत्र्यांना सांगू अशी ग्वाही दिली.

कोल्हापूर दोऱ्यासाठी निघालेल्या राज ठाकरे यांनी पुण्यातील निवासस्थानी रिक्षा संघटनेचे पदाधिकारी भेटीसाठी गेले होते. यावेळी राज ठाकरेंनी रिक्षा चालकांची विचारपूस करत त्यांच्यासोबत बैठक घेतली. त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. रिक्षा संघटनांचा बेकायदा बाइक टॅक्सीला विरोध आणि विविध मागण्यांसाठी बेमुदत रिक्षा बंदची हाक दिली.

या संदर्भात अधिकारी, पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना गेल्या वर्षभरात निवेदने दिली आहेत. मात्र, अजूनही बेकायदा बाइक टॅक्सीवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी राज ठाकरेंना निवेदन दिले. पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरामध्ये बेकायदा बाइक टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे कायदेशीर व्यवसाय करणाऱ्या सव्वा लाख रिक्षाचालकांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. म्हणूनच रिक्षा चालक आणि राज ठाकरेंची मंगळवारची भेट ही महत्त्वपूर्ण ठरली.

 

Team Global News Marathi: