…म्हणून मी उद्धव ठाकरेंची साथ सोडली ; कृष्णा हेगडे यांनी सांगितल कारण

 

ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. हेगडे यांचा पक्षप्रवेश हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातो. शिंदे गटात गेल्यानंतर हेगडे यांनी प्रतिक्रिया दिली. मी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा मला चार आश्वासनं देण्यात आली होती. मात्र ती पूर्ण झालेली नाही. त्यामुळे मी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्याचे हेगडे म्हणाले.

आमच्या मतदारसंघातील काही समस्यांबाबत ही आश्वासनं होती. मी दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी मला मोठी जबाबदारीदेखील दिली आहे. त्यामुळे मी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. ठाकरे गटात कुणावरही माझी नाराजी नाही. तसेच एअरपोर्ट परिसरात एक लाख घरं, पाच लाख लोक राहतात, त्यांच्या पुनर्वसनाचं काम होतं.

विलेपार्लेतील रस्त्याचा प्रश्न होता तसेच पक्ष संघटनवाढीत भूमिका बजावण्याची माझी इच्छा होती. या प्रमुख अपेक्षा होत्या. एकनाथ शिंदे यांनी या अपेक्षा पूर्ण होण्याचे आश्वासन दिले. शिंदे गटात गेल्यानंतर खोके घेतल्याचा आरोप केला जातोय, यावरही हेगडे यांनी मत मांडले. खोका वगैरे काही नाही, माझ्यासोबत धोका झालाय. त्यामुळे मी शिंदे गटात जातो. २०२१ मध्ये कृष्णा हेगडे यांनी भाजपातून शिवसेनेत प्रवेश केला होता. त्याआधी ते काँग्रेसमध्ये होते. मात्र दोन वर्षांतच त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडत शिंदे गटात प्रवेश केला.

Team Global News Marathi: