पुणेकरांनो नियम पाळा अन्यथा कडक पाऊले उचलावी लागतील, अजितदादांचा इशारा

पुणे : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या स्थानिक प्रशासनाच्या अडचणी वाढवता दिसत आहे.

आज पुण्यात सुद्धा कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे, त्यामुळे पालकमंत्री अजित पवारांनी आज पुण्यात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय प्रतिनिधी आणि पोलिस विभागातील प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यामध्ये या सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी पुणेकर आणि पिंपरी-चिंचवडकरांना २ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

“घालून दिलेले नियम लोकांना पाळायला हवेत. ते जर पाळले नाहीत, तर येत्या २ एप्रिलला नाईलाजास्तव कठोर निर्णय घ्यावा लागेल”, असा इशारा अजित पवारांनी पुणेकरांना दिला आहे.

लॉकडाऊन जाहीर केला, तर गोरगरीबांचा रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण होतो. तो होऊ द्यायचा नाही म्हणून आम्ही आवाहन करत आहोत. तो होऊ द्यायचा नसेल, तर लोकांनी नियम पाळणं आवश्यक आहे. मागच्या तुलनेत मृत्यूदर कमी झालाय हे खरं आहे.

मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर कठोर निर्णय घेण्याची वेळ येईल. २ एप्रिलपर्यंत तो निर्णय घेतला जाईल. त्यामुळे सर्वांना आवाहन आहे की नियम पाळा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा” असे आव्हान त्यांनी केले आहे.

Team Global News Marathi: