मनसुख हिरन यांच्या तोंडावर दिसलेले रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब – आशिष शेलार

मनसुख हिरन यांचा मृतदेह ज्यावेळी सापडला त्यावेळी त्यांच्या तोंडावर सफेद रुमाल असल्याचे सर्वांनीच पाहिले होते मात्र हे रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब झाल्याचे उघड करीत भाजपा आमदार अॅड. आशिष शेलार यांनी हिरन यांच्या केसमधील अनेक पुरव्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड करणारे, पोलिस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते या सगळयांची चौकशी एनआयए ने करावी, अशी मागणी आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केली आहे.

मनसुख हिरन यांच्या केसमधील अनेक कागदपत्रे उघड करीत आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ही केस दाबण्यासाठी सरकारमधील कोण मंत्री काम करीत होते, असा सवाल उपस्थित केले आहेत. आज वांद्रे पश्चिम येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, महाराष्ट्रात गेले काही दिवस जे सुरू आहे त्यातील ब-याच प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील ठाकरे सरकारला द्यावी लागणार आहेत. कारण अनुत्तरीत प्रश्नांची मालिकाच सुरू झाली आहे. कारण हे प्रश्न आपल्या कु कृत्यामुळे ठाकरे सरकारमधील अधिकारी निर्माण करीत आहेत.

मनसुख हिरन यांच्या खूनाचे प्रकरण आता एनआयएकडे गेले आहे. पण एनआयएकडे जाण्याआधी याप्रकरणी ठाकरे सरकार ही केस एनआयएकडे देण्यास तयार नव्हती. न्यायालयातून आदेश आल्यानंतर सुध्दा ही केस ठाकरे सरकार एनआयएकडे देण्यास तयार होत नव्हते. वारंवार केंद्रीय गृह सचिवांनी या केसमधील कागदपत्रांची मागणी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली पण तरीही हे सरकार कागदपत्रे देण्यास तयार नव्हते. शेवटी ठाण्याच्या न्यायालयाने निर्देश दिले त्यामुळे ठाकरे संरकारसमोर अन्य पर्यायच उरला नाही. त्यावेळी ही कागदपत्रे एटीएसकडून एनआयएकडे हस्तांतरीत करण्यात आली.

या प्रकरणात म्हणून सवाल हा उपस्थितीत होतो की राज्य सरकार मनसुख हिरेन यांची केस आपल्याकडेच का ठेवू पाहत होते. त्याचे उत्तर स्पष्ट आहे की, मनसुख हिरेन यांच्या खुनाच्या केसमध्ये राज्य सरकारमधील मंत्री, नेते, अधिकारी मिळून एक मोठे षडयंत्र रचून या केसमधील पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करणे, तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करीत होते.

मनसुख यांचे शव जेव्हा मुंब्य-राच्या खाडीत सापडले त्यावेळी समोर आलेल्या व्हिडिओमध्ये मनसुख यांच्या तोंडावर रुमाल होते. मात्र त्यांच्या छवविच्छेदन अवालामध्ये मृतदेहासोबत सापडलेलया वस्तुंची जी नोंद आहे त्यामध्ये या रुमालांची नोंद नाही हे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी अहवालच उघड करून आज मिडियासमोर आणले. मग हा महत्वाचा पुरवावा पोलीसांनी कुणाच्या सांगण्यावरून नष्ट केला असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यानी केला.

मनसुख यांच्या सारख्या केसमध्ये शवविच्छेदन करताना राष्ट्रीय मनावायोगाच्या नियमाप्रमाणे संपुर्ण चित्रण करावे लागते. या शवविच्छेदनासाठी दोन तास लागले. पण प्रत्यक्षात यातील एक एक मिनिटाच्या सात ते आठ क्लिप व्हिडिओ का बनविण्यात आल्या. संपुर्ण चित्रण का करण्यात आले नाही. डॉक्टरांना तसे आदेश कुणी दिले होते. सरकारी इस्पितळातील डॉक्टरांनी पुरव्यांशी छेडछाड कुणाच्या सांगण्यावरून केले तो मंत्री कोण तो नेता कोण असा सवाल आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला.

Team Global News Marathi: