पुण्यातील तीन खाजगी लॅब सील, वाचा काय आहे कारण

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे ट्रेसिंगवर जास्तीत जास्त भर दिला जात आहे. त्याचमुळे कोरोनाला रोखण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देऊन टेस्टीन अधिक वाढवल्या जात आहे. मात्र या टेस्टिंग करताना निमसरकारी/खाजगी लॅबचा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार करोना चाचणी केलेल्या आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची अपुरी माहिती पाठविणाऱ्या तीन खासगी प्रयोगशाळा पुणे महापालिकेने सोमवारी सील केल्या आहेत. त्यामध्ये ‘क्रस्ना लॅब’, ‘मेट्रोपोलिस लॅब’ आणि ‘सबअर्बन डायग्नोस्टिक सेंटर’ या बड्या खासगी प्रयोगशाळांचा समावेश असून, पुढील आदेश येईपर्यंत करोना चाचणी करू नका, अशी ताकीद या प्रयोगशाळांना देण्यात आली आहे.

अनेकदा सूचना देऊनही प्रयोगशाळेत करोना चाचणी करणाऱ्यांची माहिती वेळेत न दिल्याबद्दल; तसेच अपूर्ण पत्ते पाठविल्याने ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’मध्ये अडथळे येत आहेत. त्यामुळे या प्रयोगशाळांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला. अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल यांनी सोमवारी याबाबतचे आदेश दिले.

Team Global News Marathi: