एडेलवाईस म्युच्युअल फंड १० मार्च, २०२१ रोजी लाँच करणार

भारतातील वेगाने वाढणाऱ्या एएमसीपैकी एक असलेल्या एडेलवाईस असेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ने आज एडेलवाईस निफ्टी पीएसयू बॉण्ड प्लस एसडीएल इंडेक्स फंड – २०२६ लाँच करण्याची घोषणा केली. अशा प्रकारचा हा पहिला निर्देशांक फंड आहे जो निष्क्रीयपणे व्यवस्थापित असेल आणि एएए मुल्यांकित (AAA Rated) पीएसयू बॉण्ड्स आणि स्टेट डेव्हलोपमेंट लोन्स (एसडीएल) मध्ये गुंतवणूक करेल.

 

रु. ५,०००/- इतक्या कमी गुंतवणूकीच्या रकमेसह, फंडची परिभाषित परिपक्वता तारीख एप्रिल, ३०, २०२६ असेल. परिपक्वते नंतर गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीचे उत्पन्न परत मिळेल. गुंतवणूकदारांना परताव्याची स्थिरता आणि दृश्यता मिळावी यासाठी फंड परिपक्वतेपर्यंत बॉण्ड्स मध्ये निवेशीत राहण्याचे लक्ष्य ठेवेल. इंडेक्सएशन नंतर २०% दराने कर आकारला जात असल्याने, हा निधी पारंपारिक निवेशाच्या मार्गांच्या तुलनेत अधिक कर-कार्यक्षम असेल.

 

श्रीमती राधिका गुप्ता, एडेलवाईस म्युच्युअल फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या, “गेल्या वर्षी कॉर्पोरेट बाँड ईटीएफ सह लाँच केलेल्या भारत बॉण्ड्सच्या यशा नंतर, आता गुंतवणूकदारांमध्ये टार्गेट मॅच्युरिटी डेट फंडाच्या लोकप्रियतेत लक्षणीय वाढ झाल्याचे पाहून आम्हाला आनंद झाला आहे. गेल्या काही आठवड्यांत उत्पन्ने वाढली आहेत आणि टार्गेट मॅच्युरिटी फंडमध्ये गुंतवणूक करून जास्त उत्पन्न देणारी गुंतवणुक सुरक्षित करण्यासाठी ही चांगली संधी आहे. हा निर्देशांक फंड कमी खर्चात आणि योग्य प्रमाणात उच्च सुरक्षा आणि पारदर्शकतेसह दृश्यमान आणि कर कार्यक्षम परतावा देऊ शकतो. बचतीचे आर्थिककरण हा महत्वाचा केंद्रबिंदू असल्यामुळे अशे उपाय गुंतवणूकदारांचा डेट म्युच्युअल फंडस् मध्ये विश्वास वाढेल. आम्ही आमच्या गुंतवणुकदारासाठी अशी आणखीन नाविन्यपूर्ण परंतु सोप्या उपाययोजना सुरू करण्यास वचनबद्ध आहोत.”

 

टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड मुख्यतः निफ्टी पीएसयू बाँड प्लस एसडीएल ५०:५० निर्देशांकाच्या घटकांमध्ये गुंतवणूक करणारा पहिला ओपन-एंडेड फंड आहे. एएए पीएसयू बाँड्स आणि एसडीएलच्या गुंतवणूकीचे प्रमाण समानतेने विभाजित केले जाईल ज्यात प्रत्यकी ५०% भार दिला जाईल. कोणत्याही कंपनीच्या बॉन्ड्स किंवा लोन मध्ये गुंतवणूक कॉर्पसच्या १५%ला मर्यादित केले जाईल. त्यानंतर, दर तीन महिन्यांनी रीबॅलेन्सिंग आणि निर्देशांक घटकांचा आढावा घेण्यात येईल.

Team Global News Marathi: