पुणे :सरपंच निवडीपूर्वी सदस्यांच्या नावाने जादूटोणा

राज्यातील नेक ग्रामपंचातींमध्ये सरपंच आणि उपसरपंच पदासाठी निवडणूक होणार आहे. त्यात पुणे येथील मावळमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टाकवे गावात ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने जादूटोणा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी ही घटना घडल्याचे निर्देशनास आले होते.

मावळमधील टाकवे येथील ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून ती खिळ्याने झाडाला ठोकल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अविनाश असवले यांनी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मावळ येथील टाकवे गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांच्या नावे लिंबावर लिहून, त्यांना खिळे टोचले. त्यानंतर ते लिंबू एका झाडाला ठोकले. हा जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या जादूटोण्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. टाकवे येथील सरपंच आणि उपसरपंचपदासाठी निवडणूक होणार होती. त्या पार्श्वभूमीवर हा जादूटोण्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Team Global News Marathi: