रावणाच्या श्रीलंकेत पेट्रोल कसे स्वस्त, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणतात की….

इंधन दरवाढ विरोधात राज्यात तसेच देशभरात विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. शेजारी देश नेपाळ आणि श्रीलंकेच्या तुलनेत आपल्याकडे पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त का आहेत अशी विचारणा समाजवादी पक्षाचे खासदार विश्वंभर प्रसाद निषाद यांनी राज्यसभेत केली आहे.


“माता सीतेच्या नेपाळ आणि रावणाच्या श्रीलंकेत पेट्रोल स्वस्त आहे. तर मग आपलं सरकार प्रभू रामाच्या देशातही पेट्रोल, डिझेलचे दर कमी करणार का? असा सवाल त्यांनी विचारला होता. यावर आता केंद्रीय पेट्रोलिय मंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना भारताच्या तुलनेत कमी लोकसंख्या असणाऱ्या देशांसोबत तुलना करणं अयोग्य असल्याचं म्हटलं. या देशांची लोकसंख्या कमी असल्याने इंधनाचा वापरदेखील कमी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: