पुणे : गुरु-शिष्याच्या नात्याला काळिंबा, शिक्षकाने केला विध्यर्थीनीवर बलात्कार
विध्यार्थी आणि शिक्षकाचे नटे हे पवित्र मानले जाते. मात्र पुण्यात या नात्याला काळिंबा फासणारी घटना घडलेली आहे. पुण्यातील कोंडवा परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पुण्यात खळबळ माजलेली आहे. मर्चंट नेव्हीच्या कोर्सचा खर्च करतो असे आमिष दाखवून तरुणीला मित्राच्या फ्लॅटवर नेऊन तेथे तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या केस प्रकरणी मोसीन शेख याच्याविरुद्ध कोडवा पोलीस स्थानकात १८ वर्षीय तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार कोंढव्यातील अशोका म्युज येथे १० जुलैला दुपारी घडला. करिअर मार्गदर्शन करणार्या एका कोचिंग क्लासमध्ये मोसीन शेख हा शिक्षक म्हणून काम करतो.
तरुणीने नुकतीच बारावीची परिक्षा दिली आहे. त्याचा निकाल अद्याप येणे बाकी आहे. गेल्या वर्षी आक्टोबरमध्ये शेख याने या तरुणीच्या कॉलेजमध्ये करिअर गाइडन्सवर लेक्चर दिले होते. या संदर्भात शेख याने फॉर्मचे बाराशे रुपये आणि क्लासचे सात हजार रुपये फी सांगितली मात्र ही फी ती तरुणी न भरण्याच्या कुवतीचा फायदा शेख याने घेतला.
तुझ्या फीचे मी पाहतो, असे सांगून तिला कारमध्ये बसवून एका मित्राकडे काम असल्याचे सांगत तिला एका मित्राच्या घरी नेले. तेथे त्याने या तरुणीवर बलात्कार केला. ही गोष्ट कोणाला सांगू नको, म्हणून धमकावले. दुसर्या दिवशी या तरुणीने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी कोंढवा पोलिसांत तक्रार दिली. या तरुणीने पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती शेख याला समजल्यानंतर तो फरार झाला आहे