Tuesday, May 30, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ब्रेकिंग :नवी मुंबईचे आयुक्तपदी बार्शीचे सुपुत्र अभिजित बांगर नवे आयुक्त ;वाचा कोण आहेत बांगर

by ग्लोबल न्युज नेटवर्क
July 14, 2020
in Success Story
0
ब्रेकिंग :नवी मुंबईचे आयुक्तपदी बार्शीचे सुपुत्र अभिजित बांगर नवे आयुक्त ;वाचा कोण आहेत बांगर

ब्रेकिंग :नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची अखेर बदली ;अभिजित बांगर नवे आयुक्त

आयएएस अभिजित बांगर यांनी स्वीकारला पदभार

नवी मुंबई : महापालिका आयुक्तांच्या बदलीवरून सुरू झालेल्या नाट्यमय प्रकरणावर अखेर आज पडदा पडला.
आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची आज बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी नियुक्त करण्यात आलेले आयएएस अभिजित बांगर यांनी आज सकाळी अचानक महापालिका मुख्यालयात भेट देऊन सर्वांना आश्चर्यचा धक्का देत पदभार स्वीकारला. यावेळी मिसाळ हे सुद्धा कार्यलयात होते. मिसाळ यांनी बांगर यांच्याकडे पदभार सुपूर्द केला. मिसाळ यांची थांबवलेली बदली झाल्यामुळे महापालिका वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांचे प्रमाण रोखण्यात अपयश आल्यामुळे अण्णासाहेब मिसाळ यांची
काही दिवसांपूर्वीच नगरविकास खात्याने तडका-फडकी बदली केली होती. अचानक झालेल्या बादलीमुळे सर्वांचं आश्चर्याचा धक्का बसला होता. मिसाळ यांच्या जागेवर नागपूरचे अतिरिक्त विभागीय आयुक्त अभिजित बांगर यांची नियुक्ती केली होती. मिसाळ हे फक्त आयुक्त नसून निवडणूक आयोगाने त्यांची नियुक्ती प्रशासक म्हणून केली असल्याने त्यांची अचानक झालेली बदली सरकारला थांबवावी लागली.

त्यामुळे बांगर रुजू होण्यापूर्वीच मिसाळ यांच्या बदलीला स्थगिती मिळाली. त्यामुळे मिसाळ यांनी पुन्हा शहरात कामाला श्रीगणेशा करून कोरोना रोखण्याकरिता विविध योजना आखल्या. स्वतः रस्त्यावर उतरून शहरात विविध ठिकाणच्या हॉट-स्पॉटला भेटी देत अधिकाऱ्यांचे कौतुक केले. एकीकडे मिसाळ यांचे शहरात कामे सुरू असली तरी बांगर यांची नवी मुंबई महापालिकेत येण्याची तयारी थांबलेली नव्हती. बांगर यांची प्रशासनाने बदली करून त्यांना नागपूर मधून कार्यमुक्त केल्याने ते नवी मुंबईचा पदभार स्वीकारण्यास इच्छुक होते.

तर दुसरीकडे मिसाळ यांना स्थगिती मिळाल्याने बांगर यांच्यासमोर प्रतीक्षा करण्यापलीकडे पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत कोरोनाचे वाढते रुग्ण थांबवण्याचे आव्हान मिसाळ यांना देण्यात आले होते. दर दोन दिवसाआड सीएमओ कार्यालयातून कोरोनाची माहिती जाणून घेतली जात होती. त्यामुळे कोरोनाचा दबाव मिसाळ यांच्यावर वाढतच चालला होता.

अशा परिस्थितीत मिसाळ यांनीच आपल्याला कार्यमुक्त करण्याची विनंती सरकारला केल्याची सूत्रांकडून समजते. मिसाळ यांना मुक्त करताच आज सकाळी बांगर यांनी महापालिकेच्या कामाचा पदभार स्वीकारला. परंतु बांगर यांनी अचानक भेट देऊन पालिकेची सूत्रे स्वीकारल्यामूळे सर्वच अचंभीत झाले आहेत.

कोण आहेत अभिजीत बांगर?
मूळचे कळंब तालुक्यातील बांगरवाडीचे पण शिक्षण आणि संपूर्ण वास्तव्य बार्शीत. मितभाषी पण कामात सक्रिय

2008 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी

युवा आणि धडाडाचे सनदी अधिकारी म्हणून ओळख

नोव्हेंबर 2018 ते जानेवारी 2020 असे 14 महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम

14 महिन्यात कार्यकाळात नागपूरमधील कचरा आणि पाण्याची समस्या सोडवली, स्वच्छ भारतमध्ये नागपूरचा क्रमांक सुधारला

फेब्रुवारी 2020 मध्ये वस्त्रोद्योग विभागाचे संचालक म्हणून बदली झाली, मात्र त्यांनी पदभार स्वीकारला नव्हता

अखेर नागपूर विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली

नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी बदली, मात्र अण्णासाहेब मिसाळ यांची बदली रखडल्याने बांगर यांची बदलीही अधांतरी

जुलै 2020 मध्ये अखेर नवी मुंबई महापालिका आयुक्तपदी बदली

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
Tags: अभिजीत बांगरआयुक्तबार्शी
ADVERTISEMENT
Next Post
सोलापूर: धक्कादायक बातमी ; कर्जाला कंटाळून हॉटेल चालकाने पत्नी,दोन मुलांचा खून करून स्वतः केली आत्महत्या

सोलापूर: धक्कादायक बातमी ; कर्जाला कंटाळून हॉटेल चालकाने पत्नी,दोन मुलांचा खून करून स्वतः केली आत्महत्या

Recent Posts

  • पंडित नेहरू नंतर नरेंद मोदींच्या हातात येणार राजदंड
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • युवकांचे आत्महत्येचे प्रमाण चिंताजनक….
  • राशिभविष्य: जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी
  • राशिभविष्य : जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस तुमच्यासाठी

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group