पुण्याच्या नगरसेवकांना व्हिप जारी, सांगलीत झालेल्या पराभवाचा भाजपाने घेतला धसका

सांगली-मिरज-कुपवाड महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाकडे संख्याबळ असून सुद्धा सात नगरसेवकांनी दगा-फाटका केल्यामुळे राष्ट्रवादीचे दुग्विजय सूर्यवंशी महापौर पदी विराजमान झाले होते. सांगलीत झालेल्या दगाफ़टक्याची भाजपाने चांगलीच दाखल घेतली आहे.

पुणे मनपाच्या स्थायी आणि शिक्षण समितीची निवडणूका शुक्रवारी होणार आहे. स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपाकडून हेमंत रासने यांनी, तर शिक्षण समिती अध्यक्षपतासाठी भाजपाकडून मंजुश्री खर्डेकर यांनी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्षपदासाठी कालिंदा पुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी बंडू गायकवाड आणि शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी सुमन पठारे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर शिक्षण समितीच्या उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या प्राची आल्हाट यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सांगलीसारखा दगाफटका पुणे मनपात होऊ नये म्हणून भाजपने चांगलीच खबरदारी घेतली आहे.

Team Global News Marathi: