पीएफचे व्याजदर स्थिर, सर्वसामान्य कर्मचारी वर्गाला दिलासा

वर्ष २०२०-२१ च्या व्याजदरासंदर्भातील मोठी घोषणा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने अर्थात ईपीएफओ केली आहे. व्याजदर ८.५० टक्के राहणार असल्याची घोषणा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या संघटनेच्या केंद्रीय मंडळाने केली आहे. तसेच यावर्षासाठी व्याजदरामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आर्थिक वर्ष २०१९-२० मधील वार्षिक ८.५० टक्क्यांच्या तुलनेत चालू वर्षांतील व्याजदरात कपात होण्याची शक्यतावर्तवण्यात आली होती. लॉकडाउनमुळे आर्थिक संकटामुळे संघटनेच्या अनेक सदस्यांनी निधीतील रक्कम काढून घेण्याचे अनुसरल्याने सरकारला अधिक व्याज देणे शक्य होणार नसल्याच्या चर्चा होत्या. मात्र आजच्या निर्णयावरुन या सर्व चर्चा चुकीचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. ईपीएफओचा हा निर्णय सर्वसामान्यांना दिलासा देणारा असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने वर्ष २०१८-१९ मधील ८.६५ टक्क्यांवरून पुढील आर्थिक वर्षांत दर कमी करत ते सात वर्षांच्या तळात आणून ठेवले होते. यापूर्वी, २०१२-१३ मध्ये दर ८.५० टक्के असे किमान होते. तुलनेत २०१६-१७ मध्ये ८.६५ टक्के, २०१७-१८ मध्ये ८.५५ टक्के, २०१५-१६ मध्ये ८.८० टक्के असे अधिक होते.

Team Global News Marathi: