“पुजारी दुसऱ्याला केलं कारण आपल्याला देव व्हायचंय यालाच राजकारण म्हणतात”

 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंड केल्यानंतर राज्यात मोठ्या नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले तर काल गुरुवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक राजकीय व्यक्तींनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यवर टीका होत आहे.

अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका जुन्या मराठी चित्रपटातली एक व्हिडीओ क्लिप शेअर करत सूचक शब्दांत ट्वीट केलं आहे. सध्या हे ट्विट चांगलेच चर्चेत आले आहे. दिवंगत मराठी अभिनेते सदाशिव अमरापूरकर एका राजकारण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.दुसऱ्या पात्रानं अमरापूरकरांनी बांधलेल्या एका मंदिराचा उल्लेख करून त्यांना सवाल केला आहे.

व्हिडिओमध्ये, हे पात्र म्हणत आहे की,”पुजारी अण्णा बाळाला केला, कारण आपल्याला देव व्हायचंय. यालाच राजकारण म्हणतात. आपलं आपणच पागोटं डोक्यावर ठेऊन घ्यायचं नसतं. दुसऱ्याला ठेवायला द्यायचं असतं. म्हणजे ठेवणाराही खूश आणि घालून घेणाराही खूष”, असं अमरापूरकर निभावत असलेलं पात्र या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे.’ या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मिटकरी यांनी भाजपला टोला लगावला आहे.

Team Global News Marathi: