बहुमत चाचणी थांबवा, शिवसेनेची सर्वोच्च न्यायालयात घेतली धाव

 

बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आणि ११ अपक्ष असे एकूण 50 आमदारांसह बंड केलं. एकनाथ शिंदे यांच्या या बंडानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. आता उद्या म्हणजेच शनिवारी भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.

मात्र, याविरोधात शिवसेनेनं सर्वोच्च न्यायालयाला धाव घेतली आहे. सुनील प्रभू यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. आमदारांना विधानसभेत येण्यापासून रोखण्यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. उद्या होणार बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी, यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेनं नव्या सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत ११जुलैची सुनावणी आजच घेण्याची मागणी केली आहे.

‘शिवसैनिकाला’ मुख्यमंत्री करण्याबाबत राऊतांनी दिलं उत्तर, फडणवीसांना विचारला सवाल नव्या सरकारला विधानसभा अध्यक्ष आणि बहुमत चाचणीपासून रोखा. अपात्रतेच्या नोटीस दिलेल्या आमदारंना बहुमत चाचणीपासून थांबवा आणि विधानसभेत प्रवेशापासूनही रोखा, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. आता न्यायालय यावर काय निर्णय देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Team Global News Marathi: