सुधीर मुनगंटीवारांची राष्ट्रवादीवर टीका; सत्ता हातून गेल्यामुळे……….

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बहुमत सिद्ध केल्यानंतर अभिनंदनपर भाषणांना सुरुवात झाली. उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस  यांच्या भाषणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनीही अभिनंदनाचं भाषण करायला सुरुवात केली. मात्र यावेळी त्यांनी अभिनंदनापेक्षा एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना धारेवर धरण्याचीच वक्तव्य केली.

आता विरोधकांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. जल बिना मछली.. ही कशी अवस्था असते, तशी स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. सत्ता हातून गेल्यामुळे त्यांनी अभिनंदनाच्या दिवशीही कंजुषी केल्याचा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

 

विधानसभेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना सुधीन मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर तीव्र टीका केली. ते म्हणाले, ‘अजित दादांनी टीका केली. हा पक्ष समजताही येणार नाही. अजित दादांनीच आमच्यासोबत पहाटे शपथ घेतली. ते इतरांना काय सावधगिरीचा सल्ला देतायत? एकनाथ शिंदे आमदार आहेत. त्यामुळे पुढे काय होईल हे तुम्ही सांगण्याची गरज नाही. इथं विश्वगौरव देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत आहेत.

 

तसेच यापुढे राष्ट्रवादी काँग्रेसचेच सगळे माजी आमदार होणार आहेत. तुम्ही फक्त पाहिजे तर पेंशन वाढवण्याचा प्रस्ताव समोर ठेवा, असा सल्लाही सुधीन मुनगंटीवार यांनी दिला. तसेच मागील अडीच वर्ष जनता त्रस्त आणि सरकार सुस्त अशी स्थिती होती. आता तसं होणार नाही. अजित पवारांनी भाषण अभिनंदनपर भाषण करतानाही सत्ता गेल्याचं दुःख मांडलं. ही कंजुषी आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

 

Team Global News Marathi: