‘या’ मराठी अभिनेत्रीला निर्मात्याने केले होते ३ महिने कैद! ही गोष्ट बाळासाहेबांना समजताच केली सुटका, अन्..

मुंबई । मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आज सर्वांच्याच ओळखीचे आहेत. मात्र आपल्या हटके विनोदाने मराठी चित्रपट इंडस्ट्रीत आपले एक वेगळे अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री सुप्रिया पाठारे या आपणा सर्वांना माहीतच आहेत. मात्र चित्रपट सृष्टीत काम करत असताना एकदा त्यांना भयंकर संकटाचा सामना करावा लागला होता. त्याची कबुली त्यांनी एका मुलाखतीत दिली होती.

त्यांनी एका मुलाखतीत संगीतले होते की, १९९५ साली सुप्रिया यांच्यावर खूप कठिण प्रसंग ओढावला होता. एका चित्रपट निर्मात्याने चक्क त्यांना एका खोलीत डांबून ठेवले होते. जवळपास तीन महिने त्यांना खोलित कैद करुन ठेवले होते. या तीन महिन्यांत फक्त घरच्यांशीच बोलायची परवानगी त्यांना होती. यामध्ये आजून एक अट म्हणजे, बोलतानाही फक्त हिंदीतच बोलायचे.

एकदा संधी मिळताच सुप्रिया यांनी बहिणीला सगळा प्रकार सांगण्यात यशस्वी ठरल्या. सुप्रिया यांची सुटका करण्यासाठी थेट बाळासाहेबांची मदत घेण्यात आली होती. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे निर्मात्यापासून सुटका करुन घेतल्याचे सांगितले होते.

दरम्यान, सुप्रियाने विनोदी कार्यक्रम ‘फु बाई फु’, ‘जागो मोहन प्यारे’ यांसारख्या लोकप्रिय मालिकेतून रसिकांचे भरघोस मनोरंजन केले आहे. तसेच त्यांनी ‘सुपारी बायकोची’ , ‘फक्त लढ म्हणा’ , ‘करु या कायद्याची बात’ , ‘बालक पालक’ , ‘टाइमपास’ , ‘टाइमपास 2’ , ‘चि. व चि. सौ. का’ या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Team Global: