ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्यानंतर आघाडीचे शिल्पकार संजय राऊतांचे सूचक ट्विट

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वाझे मार्फत १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप लावले होते. या आरोपानंतर संपूर्ण विरोधक ठाकरे सरकारवर तुटून पडले होते. आता या आरोप-प्रत्यारोपांवर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सूचक ट्विट करून प्रतिक्रिया दिलेली आहे.

संजय राऊत यांनी रविवारी आपल्या जावेद अख्तर यांचा एक शेर ट्विट केला. राजकीय वर्तुळात या ट्विटची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे. संजय राऊत यांना या माध्यमातून नेमका काय संदेश द्यायचा आहे, यावरुन तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हम तो बस तलाश नये रास्तो की है ! हम है मुसाफीर एसे जो मंजिल से आये है! असे सूचक ट्विट राऊत यांनी केले आहे. आता राऊत यांच्या या ट्विटचे वेगवेगळे तर्क-वितर्क लागले जात आहे. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात रंगलेल्या सत्तानाट्यावेळीही संजय राऊत अशाचप्रकारे दररोज सूचक शेरोशायरी करताना दिसले होते. त्यामुळे आताही ठाकरे सरकार काही अनपेक्षित चाल खेळणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

Team Global News Marathi: