प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस, बहीण प्रियांकासाठी राहुल गांधी यांचे ट्विट

 

केंद्राने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या दीड वर्षांपासून आंदोलन करत असून हे आंदोलन दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अशात युपीतील लखीमपूर येथील शेतकरी आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. या शेतकऱ्यांना भेटायला निघालेल्या काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

रात्री उशिरा प्रियांका लखनऊला पोहोचल्या. तिथून त्या लखीमपूरला पावसात रवाना झाल्या. आज पहाटे 5.३० च्या सुमारास उत्तर प्रदेश पोलिसांनी प्रियांका गांधींना हरगाव पोलीस स्टेशन परिसरातून ताब्यात घेतलं आहे. प्रियांका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी प्रियांका गांधींसाठी एक ट्विट केलं आहे.

राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींना हिंमत ठेवून मागे न हटण्यास सांगितलं आहे. प्रियंका, मला माहीत आहे की तू मागे हटणार नाहीस. ते तुझ्या हिमतीने भयभीत झाले आहेत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. न्यायासाठीच्या या अहिंसक लढाईत आपण देशाच्या अन्नदात्याला विजयी करू, असं देखील राहुल गांधींनी म्हणाले आहेत. प्रियांका गांधींना सीतापूर जिल्ह्यातील एका गेस्ट हाऊसमध्ये नेण्यात आले आहे. यूपी काँग्रेसने ट्विट करुन लोकांना समर्थनासाठी या भागात पोहोचण्यास सांगितले आहे. प्रियांका गांधींना ताब्यात घेऊन पोलीस त्यांना सीतापूर जिल्ह्यातल्या सिंधोली येथे घेऊन गेले आहेत, तिथे त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

Team Global News Marathi: