प्रियांका गांधी वाड्रा होणार उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री, काँग्रेसच्या या नेत्याचा दावा

 

उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना स्थानिक राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यात सत्तेत असलेल्या योगी सरकारला खाली खेचण्यासाठी सर्वच राजिक्य पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे तसेच काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी उत्तर प्रदेश निवडणुकीवर स्वतः लक्ष देऊन आहेत.

यातच आता उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी वाड्रा या काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील, असा दावा उत्तर प्रदेश काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

देशातील काही राज्यात होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने काँग्रेस पक्षाकडून पक्षसंघटना बळकटीसाठी जोरदार तयारी केली जात आहे. त्यातील एक उत्तर प्रदेशात काँग्रेसकडून सर्वच्या सर्व ४०३ जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे.

या दरम्यान आज काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राजेश तिवारी यांनी प्रियांका गांधी वाड्रा यांच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भात नवा दावा केला आहे. पुढील वर्षात होणाऱ्या विधानसभा निवडणुका प्रियांका यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपले उमेदवार उभे करणार आहे. जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकाऱ्यांनाही प्रियांकांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा आहे.

Team Global News Marathi: