Saturday, February 4, 2023
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
No Result
View All Result

प्रिय नीतू बाळा तुला अजून होमवर्कची गरज; सुषमा अंधारे यांचं पत्र

by Team Global News Marathi
November 28, 2022
in राजकारण
0
प्रिय नीतू बाळा तुला अजून होमवर्कची गरज; सुषमा अंधारे यांचं पत्र

 

भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये ते म्हणाले होते, सांगा कुणी केली बाळासाहेबांसोबत गद्दारी? बाळासाहेबांवर टीका करणाऱ्यांनी शिवबंधन बांधलेच कसे? असे प्रश्न राणे यांनी केले होते. त्यामुळे सुषमा अंधारे त्यांच्या या टीकेमुळे चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनीही भाषण करतानाचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओला उत्तर म्हणून सुषमा अंधारे यांनी एक पत्र नितेश राणे यांना लिहिले असून त्यासोबत नितेश राणेंच्या जुन्या-नव्या वक्तव्यांचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. दरम्यान या पत्रामध्ये राणेंच्या पूर्वीच्या भूमिका आणि आज बदललेल्या भूमिका यावरुन अंधारेंनी त्यांना चिमटे काढले आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी हे पत्र लिहिले आहे.

पत्रात सुषमा अंधारे म्हणाल्या…

प्रिय नीतू बाळा, तुझा अभ्यास फारच कच्चा आहे. तुला अजून होमवर्क ची गरज आहे. तब्बल वीस वर्षांपूर्वीचा महाविद्यालयीन वाद-विवाद स्पर्धेतला व्हिडिओ शेअर करताना किमान चेहरा पट्टीतील बदल तरी तू लक्षात घ्यायला हवा होतास. पण असू दे बाळा. मुळात माझ्या भावाने तुझ्या अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष दिले असते तर तू आता अशा अर्ध्या-कच्च्या संकल्पना घेऊन बोलत राहिला नसतास.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल २०१५ सालचे तुझे ट्विट ही जर तुझी आज चूक असेल तर ते तू अजूनही डिलीट का केले नाहीस किंवा गाणसम्राज्ञी लता मंगेशकरजी या मोदीजींच्या स्टेजवर गेल्या म्हणून तू त्यांचा भारतरत्न परत मागितला या तुझ्या बालिश वक्तव्यांवर मी अजिबात बोलणार नाही. मी तुला अस्सल व्हिडिओ तुझ्या आजमितीला असणाऱ्या प्राणप्रिय नेत्याचा तुला पाठवत आहे. भर सभागृहात आपल्याच सख्ख्या वडिलांचे म्हणजेच माझ्या भावाचे वस्त्रहरण करणाऱ्या देवेंद्रजींना तू नेता कसे काय स्वीकारले असेल बरे? हा व्हिडिओ ऐकल्यावर जर तुला काही शंका उपस्थित होणार असतील तर मला पुन्हा एकदा अभ्यास घ्यायला आवडेल, असे पत्रात सुषमा अंधारे यांनी लिहिले आहे.

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window)
  • Click to share on Twitter (Opens in new window)
  • Click to share on WhatsApp (Opens in new window)
ADVERTISEMENT
Next Post
मनीषा कायंदेंनी केला नारायण राणेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’

मनीषा कायंदेंनी केला नारायण राणेंचा ‘करेक्ट कार्यक्रम’

Recent Posts

  • मालवणात बॅनर लावण्यावरून भाजप-ठाकरे शिवसेनेत वाद, नेमकं काय आहे प्रकरण
  • ईडी कारवाईनंतर केडीसी जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
  • शुभांगी पाटील लवकरच उद्धव ठाकरे यांची घेणार भेट
  • व्हॉट्सअॅप स्टोरेज फुल झालं ? एका मिनिटात स्पेस कशी रिकामी करायचा
  • कसबा पोटनिवडणुकीतून टिळक कुटुंबियांना डावलून या नावाची जोरदार चर्चा

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • राजकारण
  • जनरल
  • मनोरंजन
    • सुविचार
    • Success Story
  • व्हिडीओ
  • शैक्षणिक
  • आरोग्य
  • कृषी
  • वाढदिवस विशेष
  • नौकरी
  • देश विदेश
  • महाराष्ट्र

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp Group