पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री योगींचे केले तोंडभरून कौतुक

 

उत्तरप्रदेश | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज तब्बल २ हजार ३२९ कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या नऊ वैद्यकीय महाविद्यालयांचे उदघाटन केले. यावेळी मोदींनी ‘निरोगी भारताचे स्वप्न पूर्ण होत आहे यासाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन’ असे म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे तोंदभरून कौतुक केले होते.

मोदीजी म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशचे लोक विसरू शकत नाहीत की योगीनी संसदेत राज्याच्या खराब वैद्यकीय व्यवस्थेची व्यथा कशी सांगितली. तेव्हा योगीजी मुख्यमंत्री नव्हते, ते खासदार होते आणि आज लोक पाहत आहेत योगींनी जनतेची सेवा करण्याची संधी दिली तेव्हा त्यांनी या क्षेत्रातील हजारो मुलांचे प्राण वाचवले, असे पंतप्रधान म्हणाले.

‘जेव्हा सरकार संवेदनशील असते, गोरगरिबांच्या वेदना समजून घेण्यासाठी मनात करुणेची भावना असते, तेव्हा हे असे काम होते. उत्तर प्रदेशच्या इतिहासात एकाच वेळी इतक्या वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाल्याचे कुणाला आठवते का? हे पूर्वी का झाले नाही आणि आता का होत आहे, याचे एकच कारण आहे, राजकीय इच्छाशक्ती आणि राजकीय प्राधान्य,’ असे मोदी म्हणाले.

Team Global News Marathi: