मोठी बातमी एसटीच्या तिकीट दारात १७ % टक्यांनी वाढ

 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिने लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे एसटीच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या त्यामुळे मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाला तोटा सहन अकरावा लागला होता. त्यातच लॉकडाऊनमध्ये शिथिलता देत असताना एसटी पूर्वपदावर येत असताना दुसरीकडे वाढत्या इंधनाच्या दरामुळे एसटीवर अधिक बोझा वाढताना दिसून येत होता.

याच पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव पाठवला होता. एसटीच्या या प्रस्तावाला सरकारकडून आता परवानगी मिळाली आहे. मंगळवारपासून राज्यभरात एसटीच्या दरात सतरा टक्क्यांची वाढ होणार आहे. ही दरवाढ दिवाळीच्या तोंडावर होत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून राज्यातील परिवहन बस तोट्यात होती. कर्मचाऱ्यांच्या पगारीही वेळेवर होत नव्हत्या. एसटी प्रशासन तोट्यात असण्याचे एक कारण म्हणजे ज्या प्रमाणात डीझेलच्या किंमती वाढल्या होत्या त्याप्रमाणात तिकीट दर वाढले नव्हते. यासाठी एसटी प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे मंगळवारपासून राज्यभरात एसटी तिकिटाचे दर सतरा टक्क्यांनी वाढणार आहेत.

Team Global News Marathi: