संपूर्ण देशभसरात कोरोना रुग्णसंख्या झपाटयाने वाढताना दिसत आहे. त्यात मृत्यूचे प्रमाणही वाढलेले दिसून येत आहे. आज वाढत असलेल्या कोरोना संसर्गाच्या मुद्द्यावरून देशातुन तसेच विदेशातून मोदी सरकार आणि त्यांच्या धोरणनावंर जोरदार टीका होताना दिसत आहे. आज कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यात पंतप्रधान मोदी पुर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. यावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टिका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठी बिनकामाची मालमत्ता असल्याचं मिम्स चव्हाण यांनी ट्विट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्वात मोठे नाॅन परफोर्मिंग असेट असल्याचं मिम्स पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केले आहे. ट्विटमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो असून त्यामध्ये भारतातील सर्वाेच्च बिनकामाची मालमत्ता असे म्हटलेले आहे. तर काही वेळ अगोदर गंगा नदीत सापडलेल्या कोरोना रूग्णांच्या प्रेतावरूनही भाजपाला टार्गेट केले आहे.
कोव्हीड रूग्णांचा खरा आकडा आता गंगा नदीत सापडण्यास सुरूवात झाली आहे असं म्हणत केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दोन्ही ट्विटीची नेटकऱ्यांनी चांगलीच दखल घेतल्याचे दिसून येत आहे. नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीवरून देशातील नाही विदेशातील नागरिकांनी सुद्धा जोरदार टीका केली आहे.
— Prithviraj Chavan (@prithvrj) May 13, 2021