महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढत असताना पंतप्रधान मोदींना पाकिस्तानची चिंता

मुंबई : देशभरात विशेष करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य सरकारच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाजूच्या शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णवाढीची चिंता लागली आहे असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला कोरोना लसींचा पुरवठा करण्याऐवजी मोदी सरकार पाकिस्तान आणि इतर देशांना लस पुरवत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
पुढे बोलताना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. कोरोना महामारीच्या मोठ्या संकटातून महाराष्ट्र पुन्हा जात आहे. लसीकरणाची मोहीम मोठ्या प्रमाणात राबवणे गरजेचे आहे.

आज या वेगाने लसीकरण सुरु राहिले तर ते पूर्ण होण्यास १२ वर्ष लागतील. लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी लसींचा पुरवठाही त्याच प्रमाणात होणे गरजेचे आहे. परंतु देशात कोरोना रुग्ण वाढत असताना नरेंद्र मोदी हे पाकिस्तान व इतर देशांना लस पाठवत आहेत

Team Global News Marathi: