भाजपा आमदार अरुण नारंग यांना शेतकऱ्यांनी दिला चांगलाच चोप

चंदीगड : मोदी सरकारने पारित केलेल्या नव्या काळ्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी मागच्या अनेक महिन्यांपासून केंद्राने पारित केलेले कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करत आहे. त्यात आता शेतकरी सुद्धा आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा सुद्धा संयमाचा अंत होत आहे. त्यात आता चंदीगड येथून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.

मुक्तसर जिल्ह्यातील एका शेतकऱ्यांचा एका गटाने भारतीय जनता पक्षाच्या आमदाराला चांगलाच चोप दिला आहे. तसेच त्या आमदाराचे कपडे सुद्धा फाडले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अबोहरमधील आमदार अरुण नारंग हे पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी मलोट येथे गेले होते. शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला. मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी भाजप आमदाराला झालेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे आणि राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांच्या माराहाणीदरम्यान पोलिसांनी नारंग यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तर काही लोकांनी आपल्याला मारहाण केली आणि अंगावर काळी शाई फेकली, असं भाजप आमदार नारंग यांनी यांनी सांगितले आहे.

Team Global News Marathi: